October 31, 2026
पीएम किसान योजना

मोठी आनंदवार्ता! पीएम किसानचा 23 वा हप्ता या दिवशी जमा होणार

मोठी आनंदवार्ता! पीएम किसानचा 23 वा हप्ता या दिवशी जमा होणार

देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता नुकताच मिळाला. तर ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याने अधिक्रमण केले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गव्हासह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनाम्याची आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 23 व्या हप्त्याची सुद्धा प्रतिक्षा लागलेली आहे.

सरकार या योजनेत दरवर्षी 6,000 रुपये खात्यात जमा करते. 2,000 रुपये तीन टप्प्यात जमा करण्यात येतात. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम ही थेट डीबीटी (DBT) पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. आता शेतकऱ्यांचे लक्ष हे 23 व्या हप्त्याकडे लागलेले आहे. त्यांना हा हप्ता कधी जमा होईल याची उत्सुकता लागलेली आहे.

कधी येणार 23 वा हप्ता ?

पीएम किसान योजनेचा हप्ता हा चार महिन्यांच्या अंतराने जमा होतो. योजनेचा 22 वा हप्ता मार्च महिन्यात जमा झाला होता. त्यामुळे चार महिन्यांच्या अंतराने हा 23 वा हप्ता जुलै 2026 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. सरकारने याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. योजनेत हप्ता अगोदर जाहीर करण्यात येतो आणि पंतप्रधान देशातील कानाकोपऱ्यात असले तरी एका क्लिकवर हा पैसा धडाधड देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो.

या शेतकऱ्यांना नाही होणार फायदा

अर्थात या योजनेत बोगस लाभार्थी घुसू नये यासाठी सरकार डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवते. त्यासाठी सातत्याने काही प्रक्रिया कराव्या लागतात. जे शेतकरी ई-केवायसी(e-KYC) आणि भू-सत्यापन (Land Verification) सारखी प्रक्रिया दरवेळी पूर्ण करत नाही. त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम जमा होत नाही. तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, केवायसी अपूर्ण असेल तर जुलै महिन्यात जमा होणारा हप्ता परत जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नये असे आवाहन करण्यात येते.

असे करा स्टेट्‍स चेक
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना चार महिन्यांनी मिळेल. ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल, त्यांच्या खात्यात दोन हजार जमा होतील. या योजनेचा फायदा होईल की नाही हे तुम्हाला घर बसल्या तपासता येईल.

त्यासाठी अगोदर pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर हा पर्याया निवडा. त्यानंतर लाभार्थ्यांच्या यादीवर जा. याठिकाणी तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक टाका. आता “Get Data” वर क्लिक करा. लागलीच पेमेंट स्टेट्सवर क्लिक करून चेक करा.

ई-केवायसी पूर्ण झाली असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तर एग्रीस्टॅक या पोर्टलवर जाऊन नोंदणी करणे ही सरकारने अत्यावश्यक केले आहे. तरच खात्यात पैसा येईल.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्‍यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांचे निरसन होण्यास मदत होईल.

Leave a Comment